मावळ ऑनलाईन – लोणावळा तालुक्यातील (Lonavala Crime News)अजिवली (ता. मावळ) येथील जमीन बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा बनाव करून अर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी 11 जणा विरोधात गुहा दाखल केला आहे.ही घटना 14 ऑक्टोबर 2024 ते 9 जानेवारी 2025 या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी सुनिल दिनदयाल गुप्ता(Lonavala Crime News) (वय 52, रा. भांगरवाडी , लोणावळा) यांच्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रविंद्र धोंडू केंडे, दिपक धोंडू केंडे, सोमनाथ धोंडू केंडे आणि गणपत धोंडू केंडे,प्रकाश गंगाराम ठोंबरे, सुनिता गणपत शिवेकर, सुजाता दिनेश शिंदे, मंगेश गोविंद ठोंबरे, गणेश गोविंद ठोंबरे, लता अनंत फाटक व संगीता बंडू येवले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिवली येथील गट नं. ८८ व ४५२ मधील एकूण ४२.२२ आर क्षेत्रफळाची जमीन गुप्ता यांच्याच मालकीची असल्याचे नोंद असून, संबंधित व्यवहार कायदेशीर खरेदीखताद्वारे झाल्याचे स्पष्ट आहे.
Ganesh Maharaj Mohite : संगीत विशारद गणेश महाराज मोहिते यांचा शिष्यांकडून सत्कार
PCMC : “बांधकाम पाडलं, तर बाळाला खाली टाकून आम्हीपण आत्महत्या करू” ; अतिक्रमण विरोधी पथकाला दाम्पत्याची धमकी
मात्र, आरोपी रविंद्र धोंडू केंडे, दिपक धोंडू केंडे, सोमनाथ धोंडू केंडे आणि गणपत धोंडू केंडे यांनी आधीच रक्कम स्वीकारून विक्री केलेली असल्याचे माहित असूनही, फसवणुकीच्या उद्देशाने त्यांनी प्रकाश गंगाराम ठोंबरे, सुनिता गणपत शिवेकर, सुजाता दिनेश शिंदे, मंगेश गोविंद ठोंबरे, गणेश गोविंद ठोंबरे, लता अनंत फाटक व संगीता बंडू येवले यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करून ती दुय्यम निबंधक कार्यालय, तळेगाव दाभाडे येथे सादर केली.
या बनावट दस्ताऐवजांद्वारे त्यांनी गुप्ता यांच्या मालकीची जमीन दुसऱ्यांच्या नावावर खरेदी-विक्री दाखवून तिचा बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. लोणावळा ग्रामीण पोलिस याचा पुढील तपास करत आहेत.