मावळ ऑनलाईन – अवैध धर्मांतरण प्रकरणी उत्तर प्रदेश एटीएस ने जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबाला अटक केली. या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. छांगुर बाबाने पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे त्याच्या सहकाऱ्यांच्या नावे १६ कोटींची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे.
ब्राह्मण, ओबीसी आणि इतर जातीच्या मुलींचे धर्मांतरण करणाऱ्या छांगुर बाबाला अटक करण्यात आली. त्याने तरुणीच्या धर्मांतरणासाठी चक्क दर निश्चित केले होते. ब्राह्मण समाजाच्या तरुणींसाठी १५ ते १६ लाख रुपये, ओसीबी समाजाच्या तरुणींसाठी १० ते १२ लाख रुपये तर इतर समाजाच्या तरुणींसाठी आठ ते १० लाख रुपये असा दर होता.
Van Mahotsav: वन महोत्सवानिमित्त लीड अप इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये 251 रोपवृक्षांचे वितरण!
१०० कोटींची मालमत्ता असलेल्या छांगूर बाबाची चौकशी आता सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) केली जाणार आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्यावर अंगठ्या आणि खडे विकणाऱ्या छांगूर बाबाकडे आजच्या घडीला १०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. छांगूर बाबा आणि त्याच्याशी संबंधित संस्थांच्या बँक खात्यांमधून १०० कोटी रुपयांहून अधिकचे व्यवहार झाल्याची माहिती एटीएसच्या तपासातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये अवैध धर्मांतरणाच्या मोठ्या रॅकेटचा पदार्फाश झालेला आहे. या बाबाला विदेशातून कोट्यावधी रुपयांचे फंडिंग येत होते.
PCMC:हिंजवडीसह सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीबाबत कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
उत्तर प्रदेश एटीएस ने अटक केल्यानंतर शेकडो कोटींचे आर्थिक व्यवहार उघड झाले. त्यानंतर छांगुर बाबा प्रकरणात इडीने एंट्री केली. त्यानंतर झालेल्या तपासात अनेक नवीन खुलासे झाले आहेत. त्यामध्ये राजस्थान, लखनऊ, बलरामपूर आणि पुण्यापर्यंत धर्मांतर नेटवर्कचं कनेक्शन उघड झाले आहे. छांगुर बाबाने लोणावळा येथे १६ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. ही मालमत्ता त्याने मोहम्मद अहमद खान, नवीन रोहरा उर्फ जमालुद्दीन आणि संगीता देवी यांच्या नावे असल्याचे तपासात समोर आले आहे.
छांगुर बाबाच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले जात होते. त्याच्या या कामात बालरामपूर न्यायालयात लिपिक असलेल्या राजेश उपाध्याय हा मदत करत होता. त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून बाबाने उपाध्याय याची पत्नी संगीता देवी हिचे लोणावळा येथील मालमत्तेमध्ये नाव समाविष्ट केले असल्याचे सांगितले जात आहे.
छांगुर बाबा याच्या लोणावळा येथील संपत्तीबाबत कारवाई करण्याबाबत कोणताही पत्रव्यवहार कोणत्याही तपास यंत्रणेकडून अद्याप पर्यंत झालेला नसल्याचे लोणावळा उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक अमोल मांडवे यांनी सांगितले.