मावळा ऑनलाईन – पार्किंगसाठी इशारा केला या किरकोळ कारणावरून (Lohagad Crime News) महिलेसह तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना 28 जुलै रोजी पवनानगर जवळील लोहगड येथे घडली आहे.
PCU : पीसीयूच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संधी – कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी
याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून फिर्यादीची जाऊ तिथे जावई,मुलगी , जावेची बहीण, बानू शेख, अकबर शेख. सह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Poultryshed : पोल्ट्रीशेड नोंदणी अभियान मावळात वेगाने सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा याने फिर्यादी यांच्या जावेच्या जावयाला गाडी पार्किंगसाठी इशारा केला. या कारणावरून त्याने बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीचा भाऊ व भाच्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी फिर्यादी या त्यांना सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना आरोपींनी फिर्यादी यांना देखील मारहाण करत जखमी केले. यावरून लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Lohagad Crime News) आहेत.