मावळ ऑनलाईन –श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित (Lohagad Fort)लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने गेली २५ वर्षे लोहगड वरील शिवमंदिरात तसेच, गेली १० वर्षे विसापूर वरील शिवमंदिरात श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक करण्यात येतो.

छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः शिवभक्त होते. त्यामुळे त्यांनी गडकिल्ल्यांवरती शिवमंदिरे बांधून घेतलेली आपल्याला आढळतात. परंतु, लोहगड वरील शिवमंदिराच्या भोवती असलेल्या दगडी तटबंदी आता नामशेष झाल्या आहेत.
तसेच, विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिराच्या छपरावर असणारे पत्रे हे कधीही कोसळतील अशा अवस्थेत आहेत. कारण त्या पत्राच्या आत मध्ये असलेले लाकूड हे पूर्णपणे कुजले आहेत. याकडे पुरातत्व विभागाने ताबडतोब लक्ष द्यावे. दोन्ही किल्ल्यावरील शिवमंदिरे पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करतील अशा प्रकारचे जीर्णोद्धाराचे काम भारतीय पुरातत्व विभागाने करावे असे आवाहन या अभिषेकाच्या निमित्त संस्थापक सचिन टेकवडे यांनी केले.