मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याची जागतिक युनेस्को वारसा नोंद व्हावी यासाठी संपर्क संस्थेने 2016 पासून हेरिटेज वॉक नावाने ( Lohagad Fort) एक चळवळ सुरू केली होती आणि खऱ्या अर्थाने आज त्या चळवळीला यश आले आहे . या चळवळीमध्ये लोहगड विसापूर किल्ले संवर्धन विकास मंचचे कार्यकर्ते तसेच भाजे ग्रामस्थ लोहगड ग्रामस्थ या सर्वांचं सहकार्य लाभलं होतं.
2016 पासून या हेरिटेज वॉकमध्ये इतिहास प्रेमिंनी हजारो संख्येने सहभाग घेऊन लोहगड किल्ल्याची युनेस्को यादीमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न केले. संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी यांनीही युनेस्को यादीत लोहगड किल्ल्याची नोंद व्हावी यासाठी सरकारी पातळीवर सुद्धा पाठपुरावा ( Lohagad Fort) केला .
Shabdhan Kavyamanch : आई वडिलांमुळे मी घडलो!’ – अरुण बोऱ्हाडे
सतत पाच वर्ष हेरिटज वाक ही पदयात्रा सुरू करून या पदयात्रेमध्ये महाराष्ट्राच्या इतिहास परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला होता..या भव्य दिव्य हेरिटेज वाॅक पदयात्रेमध्ये जगभरातून लोक उपस्थित झाले होते, असे अमित कुमार बॅनर्जी ( Lohagad Fort) यांनी सांगितले.