मावळ ऑनलाईन – महाराष्ट्राच्या सह्याद्री कुशीत (Lohagad Fort)वसलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील आवडता आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेला किल्ले लोहगड याची नुकतीच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये निवड झाली आहे. या गौरवाची आनंद बातमी मावळवासीयांसाठी अभिमानाची ठरली असून, यानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ गोल्डन, तळेगाव दाभाडे तर्फे आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या उत्सवांतर्गत भव्य शोभायात्रा, साखर वाटप आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवप्रेमींनी परिसर दणाणून टाकला. आनंदाचा उत्सव म्हणजे मावळचा स्वाभिमान आणि लोहगडाच्या अस्मितेचा जल्लोष!
New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
PCMC : पहिल्या तिमाहीत १५ कोटींची पाणीपट्टी वसूल

लोहगड विसापूर विकास मंचाच्या कार्याचा गौरव
गेल्या २५ वर्षांपासून लोहगड विसापूर विकास मंच या संस्थेने तन-मन-धनाने लोहगडाच्या संवर्धनासाठी अविरत कार्य केले आहे. याच सेवेच्या फलितरूप म्हणून लोहगड युनेस्को स्थळांमध्ये निवडला गेला. या योगदानाबद्दल मंचाचे संस्थापक अध्यक्ष सचिन टेकवडे आणि कार्यकर्त्यांचा रोटरी क्लब ऑफ गोल्डन तर्फे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवर व संस्थांचा सहभाग
कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी, सहप्रांतपाल दीपक फल्ले, रायगड समितीचे कार्यवाह सुधीर थोरात उपस्थित होते.
ढोल वादनाची उत्कृष्ट सादरीकरण गणेश तरुण मंडळाने केले. स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उर्से, सावरकर गुरुकुल, लोहगड विसापूर विकास मंच तसेच मावळ पंचकोशीतील असंख्य शिवप्रेमींनी सहभाग घेतला.
रो. बसप्पा भंडारी, रो. प्रसाद पादिर, रो. दिनेश चिखले, रो. चेतन पटवा, रो. रितेश फाकटकर, रो. हर्षल पंडित, रो. सौरभ मेहता, रो. राकेश गरुड, रो. प्रदीप मुंगसे, रो. ललित देसले, रो. हर्षद जव्हेरी, रो. विजय गोपाळे, रो. साक्षी जयकर, रो. सुजाता देव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
सूत्रसंचालन रो. प्रदीप टेकवडे यांनी केले, प्रास्ताविक रो. सुरेश बावबंदे यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष रो. प्रशांत ताये यांनी केले.