मावळ ऑनलाईन – गाडीने पावसाचे पाणी उडवल्याचा जाब विचारल्याने तरुणाला बेदम मारहाण ( Kusagaon Crime News) करण्यात आली आहे.ही घटना मावळातील कुसगाव येथे बुधवारी (दि.16) घडली.
PCU : औद्यागिक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जीईसीचे दुबईमध्ये होणार उद्घाटन
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी आफ्रिदी सत्तार खान (वय 30 रा .पवनानगर,मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी इको गाडी चालक व त्याचा साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Kusagaon Crime News) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या अल्टो कार मधून जात होते. यावेळी आरोपी जोरात त्यांच्याजवळून त्याची कार घेऊन गेला. यावेळी गाडीमध्ये बसलेल्या फिर्यादी यांच्या अंगावर पावसाचे पाणी उडाले याचा राग आल्याने फिर्यादी यांनी आरोपीला जाब विचारला असता त्यांनी शिवीगाळ करत लोखंडी रोड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
यात फिर्यादी यांच्या हाताचे हाड मोडले. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत ( Kusagaon Crime News) आहेत.