situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kundmala Mishap Update : कुडंमळा दुर्घटनेनंतरच्या शोधकार्याची सांगता, ३५ जखमींना डिस्चार्ज, ११ जखमी अजूनही ‘आयसीयू’त

Published On:
Kundmala Mishap Update
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – कुडंमळा येथे रविवारी (१५ जून) दुपारी लोखंडी पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर जखमींपैकी सुमारे ३० ते ३५ जणांना सोमवारी उपचारानंतर डिस्चार्ज (Kundmala Mishap Update) देण्यात आला आहे. अद्याप १० ते १२ जण तळेगाव परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्रशासनाने अधिकृत माहिती दिली आहे.

रविवारी दुपारी कुडंमळा गावाजवळील जुना लोखंडी साकव पूल अचानक कोसळला. पूलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या दुर्घटनेत अनेकजण पाण्यात पडले. यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या मदतीने शोध व बचाव मोहीम रात्रभर सुरू ठेवण्यात आली. अखेर सोमवारी संध्याकाळपर्यंत चार मृतदेह सापडले आणि सर्व बेपत्ता व्यक्तींचा तपास पूर्ण झाल्याने शोधकार्याची सांगता (Kundmala Mishap Update) करण्यात आली.

Indori Murder : रील स्टार महिलेने केला प्रियकराचा खून, महिलेला अटक

या दुर्घटनेत एक पाच वर्षांचा मुलगाही मृत्यूमुखी पडला असून मृतांमध्ये दोन महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. एकूण ५१ जण या घटनेत जखमी झाले होते. यापैकी बरेच जण किरकोळ जखमी असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोमवारी घरी पाठवण्यात आले. मात्र काही गंभीर जखमी अजूनही तळेगावच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पर्यटनस्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना न केल्याबद्दल प्रशासनावर टीका होत आहे. दरम्यान, प्रशासनाने यापूर्वीच हा पूल वापरासाठी बंद करून तशा अशयाचा फलक (Kundmala Mishap Update) देखील लावला होता. अतिउत्साही पर्यटकांनी या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे व मोठ्या संख्येने पुलावर गर्दी केल्याने ही दुर्घटना घडल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Alandi : आळंदी ग्रामीण हद्दीत बिबट्याचा वावर आढळल्याने वनविभागाद्वारे सतर्कतेचा इशारा

शोधकार्यात एनडीआरएफ, तळेगाव एमआयडीसी पोलीस, स्थानिक तरुण तसेच वन्यजीव रक्षक संस्था मावळचे (Kundmala Mishap Update) सुनील गायकवाड, दुर्वेश साठे, प्रणय अंबुरे, ओंकार पडवळ, योगेश दळवी, आकाश मोरे, सुनील शिरसट, आनंद गावडे, अनिकेत आंबेकर, संतोष दहीभात, राजेंद्र कडू, सचिन गायकवाड, अशोक उंबरे, महेश मसने, चंदू बोंबले, दिव्येश मुनी सर, अजय शेलार, गणेश रौंदळ, सागर कुंभार, सागर दळवी, आनंद शिर्के, अनिकेत घरडले, अनिकेत इंगवले, सागर फाटक, वैभव शेलार, मोरेश्वर मांडेकर, निलेश गराडे, अनिष गराडे, भास्कर माळी, सत्यम सावंत, विनय सावंत, शुभम काकडे, सर्जेस पाटील, अविनाश कार्ले, रोहीदास कालेकर, दिनेश पवार, विघ्नेश पवार, अनिल आंद्रे, दक्ष काटकर, विकास दोडी, यश काकडे, प्रसाद महामुनी, गणेश ढोरे, गणेश निसाळ, कुंदन भोसले, गणेश गायकवाड, रवी कोळी, पिंटू मानकर, प्रभाकर भालेराव, जिगर सोलंकी, रोहित पवार, सुरज शिंदे, राजेंद्र बांडगे, कमल परदेशी हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Follow Us On