मावळ ऑनलाईन – कुंडमळा येथील दुर्घटनाग्रस्त तुटलेल्या ( Kundamala News) लोखंडी पुलाचा सांगाडा नदीच्या प्रवाहात वाहून गेला आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी उघडकीस आली आहे.
कालपासून मावळ परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे इंद्रायणी नदीने ( Kundamala News) रौद्ररूप धरण केले आहे.याचाच परिणाम म्हणून तुटलेल्या लोखंडी पुलाचा सांगाडा देखील वाहून गेला आहे.
16 जून 2025 रोजी कुंडमळा येथील लोखंडी पूल ओझ्यामुळे तुटला होता.या दुर्घटनेमध्ये 4 लोक मृत्युमुखी पडले होते. यावेळी तुटलेल्या पुलाचा ( Kundamala News) सांगाडा हा बाजूला काढून नदी किनारी ठेवला होता. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीचे पात्र ओसंडून वाहत होते त्या पाण्यात पुलाचा सांगाडा देखील वाहून गेला आहे.
निधी मंजूर पण कामाला विलंब
शेलारवाडी येथे संरक्षण दलाच्या डेपोकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी इंद्रायणी नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी शासनाने आठ कोटी रुपयांचा निधी ११ जुलै २०२४ रोजी मंजूर केला आहे. १० जून २०२५ रोजी पुलाच्या कामाचा कार्यारंभ आदेश दिला आहे. अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. पावसाळ्यात काम करणे शक्य होणार नसल्याचे स्थानिकांनी ( Kundamala News) सांगितले.