मावळ ऑनलाईन – संघटनात्मक कामात आदरणीय व्यक्तिमत्व असलेले माजी आमदार कृष्णराव भेगडे (Krishnarao Bhegde) यांच्या निधनाने संघटनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याने कार्यकर्ते पोरके झाले आहेत, असे भावपूर्ण उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
Wari Sohala : आता आतुरता विठ्ठल दर्शनाची; आज पालखी सोहळा पंढरपूरात पोहचणार
सोमवार (दि३०) रोजी भेगडे यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी सकाळी ७:३० वा. त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी कै. भेगडे यांची कन्या राजश्री म्हस्के(भेगडे), जावई राजेश म्हस्के यांची भेट घेऊन सांत्वन केले व प्रतिमेस पुष्पहार अर्पण (Krishnarao Bhegde) केला.
Monkey Rescue Operation : दुचाकीच्या धडकेने जखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने जीवदान
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे माजी अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार शेलार, उद्योजक सुधाकर शेळके, साहेबराव कारके आदिजण उपस्थित होते.
जिल्ह्यातील संघटनात्मक कामाची दिशा दाखविण्याचे काम माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केलेले असून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनातूनच संघटनेला महत्त्वाचे स्थान देत समाजोपयोगी काम करीत असल्याचे पवार यांनी यावेळी (Krishnarao Bhegde) सांगितले.

भेगडे यांच्या कामास वैचारिक अधिष्ठान- वळसे पाटील
माजी आमदार कृष्णाराव भेगडे यांनी आपल्या कार्यात संघटनात्मक बांधणीला पहिले प्राधान्य देत कार्यकर्त्यांनाही त्यांनी प्रोत्साहित करण्याचे काम केले असल्याचे माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. तसेच त्यांच्या कामास वैचारिक अधिष्ठान लाभले होते. कोणत्याही घटनेचा सखोल अभ्यास करून ते आपले संघटनात्मक काम करीत होते.
यावेळी भेगडे साहेबांचे पुतणे आनंद भेगडे, राजेंद्र घोजगे, वसंतराव भेगडे, अशोक काकडे, विठ्ठल भेगडे, बापू कराळे आदीजण उपस्थित होते.