मावळ ऑनलाईन – माजी आमदार, मावळ भूषण, शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे यांना मंगळवारी (दि. १ जुलै) दुपारी हजारो नागरिकांच्या (Krishnarao Bhegde) उपस्थितीत साश्रूनयनांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी अंत्यविधीसाठी मावळ,खेड, मुळशी, हवेली, इंदापूर आदी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांबरोबर हजारो कार्यकर्त्यांसह आप्तेष्ट, नातेवाईक मंडळी उपस्थित होती.
Friendship : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ — कृष्णराव भेगडे आणि केशवराव वाडेकर यांची असामान्य मैत्री आता आठवणीतही!*
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार लांडगे,माजी आमदार राम कांडगे, विलास लांडे, मावळचे आमदार सुनील शेळके,संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे, माजी मंत्री बाळा भेगडे, बापूसाहेब भेगडे, गणेश भेगडे, सत्यशील राजे दाभाडे, सुशील सैंदाणे, कामगार नेते विजय पाळेकर, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे,माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे,गणेश काकडे, किशोर भेगडे, रवींद्र भेगडे ,ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने (Krishnarao Bhegde) उपस्थित होते.


Mahavitran : रास्तापेठ येथे महावितरणचा ‘हिरकणी कक्षाचे’ उद्घाटन
तळेगाव शहर आणि विविध संस्थांच्या वतीने ॲड रवींद्र दाभाडे यांनी श्रद्धांजली याप्रसंगी वाहिली. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे यांनीही श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण जिल्ह्यातील अनेक पक्षाचे आमदार झाले. मात्र संपूर्ण जिल्ह्यात भेगडे साहेबांनी आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटवला. सामाजिक चळवळीतून चांगल्या विचाराने जगले आणि समाजाच्या मातीशी एक राहिले, अशा शब्दांत प्रदीप गारटकर यांनी श्रद्धांजली (Krishnarao Bhegde) वाहिली.

आमदार सुनील शेळके यांनी बोलताना, साहेबांचे नेहमीच मार्गदर्शन मिळाले. तालुक्यात आदिवासी शाळा तसेच आयटीआय सुरू करून तालुक्याला नवी दिशा दिली. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असल्याचे सांगितले. माजी आमदार विलास लांडे यांनी, शरद पवार साहेबांसाठी विधान परिषदेचा भेगडेंनी राजीनामा दिला. भेगडे साहेबांचा विचार असाच पुढे चालू ठेवावा हीच श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.


सरळ मार्गी जाणारा देव माणूस हरपला. राजकारणातील माझे गुरु होते, अशा शब्दांत माजी आमदार रामभाऊ कांडगे यांनी श्रद्धांजली वाहिली. माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी, गुरुस्थानी असलेले व्यक्तिमत्व आजकाळाच्या पडद्याआड गेले. शिक्षण, सहकार, राजकारण, सामाजकारण या क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगत अखेरची श्रद्धांजली (Krishnarao Bhegde) वाहिली.