मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ संस्थात्मक ( Krishnarao Bhegde Pharmacy) सर्वेक्षण अहवाल सादर करून पदविका फार्मसी महाविद्यालयास उत्कृष्ट दर्जा देण्यात आला. हा उत्कृष्ट दर्जा मिळाल्याबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, सचिव चंद्रकांत शेटे, उपाध्यक्ष संजय साने, खजिनदार निरूपा कानिटकर व गोरख काकडे या सर्वांनी महाविद्यालयाच्या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
Lonavala Municipal Council : लोणावळा नगर परिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर
दरवर्षी मंडळामार्फत नेमणूक केलेल्या देखरेख समितीच्या पथकाद्वारे सदर सर्वेक्षण करण्यात येते. देखरेख समितीच्या पथकाने महाविद्यालयास भेट दिली. त्या वेळी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, आधुनिक प्रयोगशाळा,ग्रंथालय, सर्व महाविद्यालयात रुग्ण समुपदेशन, पायाभूत सुविधा,संगणक कक्ष, महाविद्यालयाचा पालक सभा, औद्योगिक भेट, निकाल, ( Krishnarao Bhegde Pharmacy) अनुभवी शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहली, ग्रीन कॅम्पस आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी घेतलेले उपक्रम, नोकरी साठीचे नामांकित कंपन्यांचे नोकरी मेळावा, मुलींच्या वसतिगृहातील दर्जेदार सोयी सुविधा अशा अनेक उपक्रमांमुळे तसेच निकालातील सातत्यपूर्ण प्रगती या गोष्टींचा आढावा घेण्यात आला.
Rashi Bhavishya 8 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
गुणवत्ता पाहून कृष्णराव भेगडे फार्मसी या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी उत्कृष्ट दर्जा प्रदान केला आहे, असे कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे व डी फार्मसी विभागप्रमुख डॉ गुलाब शिंदे यांनी नमूद ( Krishnarao Bhegde Pharmacy) केले. या अहवालानुसार मंडळाने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कृष्णराव भेगडे डी फार्मसी ला उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा देऊन प्रमाणित केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी सांगितले केले की भारतीय औषध निर्यात वित्तीय वर्ष २४-२५ मध्ये ३०.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोहोचली( Krishnarao Bhegde Pharmacy) आहे. त्याचप्रमाणे भारतीय औषधी कंपन्यांचा जागतिक बाजारपेठेतील ५.९२% हिस्सा आहे. यामध्ये असलेले फार्मासिटिकल कंपनीचे योगदान त्यांनी सांगितले. तसेच जगातील ६५ ते ७० टक्के लसींचा पुरवठा हा एकमेव भारत देश करतो असेही काकडे म्हणाले.
औषधनिर्माण शास्त्र विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना आयटी कंपनीतील असलेल्या संधी तरुणांना आकर्षित करत आहेत म्हणून त्या अनुषंगाने तळेगाव मध्ये डी फार्म, बी फार्म आणि एम फार्म हे वेगवेगळे अभ्यासक्रम चालू करण्यात आले पुढील वर्षीपासून संशोधनात्मक असलेल्या संधी पाहता पीएचडी अभ्यासक्रम चालू करण्याचा संस्थेचा मानस आहे असेही त्यांनी सांगितले.
या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे प्राचार्य डॉ संजय आरोटे आणि डी फार्मसी चे विभाग प्रमुख डॉ. गुलाब शिंदे या सर्वांचे मोलाचे सहकार्य ( Krishnarao Bhegde Pharmacy) लाभले.