मावळ ऑनलाईन – मावळभूषण कृष्णराव भेगडे हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक राजकीय क्षेत्राबरोबरच मानवतेला साजेशे वर्तन केले. आदरणीय कृष्णराव भेगडे यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली. त्यांना माणसाची पारख होती. त्यांनी ज्ञानाचा वटवृक्ष फुलवला. असे उद्गार इंद्रायणी महाविद्यालयाचे (Krishnarao Bhegde) प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी काढले.
Rashi Bhavishya 16 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
मंगळवार (दि. १५) इंद्रायणी महाविद्यालयात तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या मावळभूषण कृष्णराव भेगडे श्रद्धांजलीपर सभेत ते बोलत होते. यावेळी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे, संस्थापक विलास भेगडे, सचिव केदार शिरसट,कार्याध्यक्ष जगन्नाथ काळे, खजिनदार अंकुश दाभाडे,पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे, सचिव केदार शिरसट, सल्लागार विवेक इनामदार, गोरख काकडे, ॲड. मधुकर रामटेके, प्रा. आर. आर. डोके, प्रा. डॉ. संदीप कांबळे, डॉ. संदीप गाडेकर, राधाकृष्ण येणारे, रमेश फरताडे, बद्रीनारायण पाटील, सुरेश शिंदे,अमित भागीवंत ,मयूर सातपुते आणि प्रेस फाउंडेशनचे सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित(Krishnarao Bhegde) होते.
Chakan Crime News : शेलपिंपळगावमध्ये दरोडा; ५ लाखांचा ऐवज लंपास
प्रेस फाउंडेशनच्या सदस्यांनी यावेळी भेगडे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख अधोरेखित करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रा. आर. आर. डोके यांनी कृष्णराव भेगडे यांच्या कार्याचा जवळून झालेला परिचय सांगत त्यांच्या प्रति आपल्या भावना समर्पित केल्या. पत्रकार विलास भेगडे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना कृष्णराव भेगडे साहेब हे हाडाचे पत्रकार होते. भेगडे साहेबांच्या कृतार्थ हाताचा स्पर्श ज्यांना झाला ते खरंच भाग्यवान ठरले आहेत असे सांगताना त्यांनी कृष्णराव भेगडे साहेबांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.
कौटुंबिक जीवनातील आठवणी सांगताना पाणवलेल्या डोळ्यांनी अतिशय भावुक अंतकरणाने त्यांनी कृष्णराव भेगडे यांच्या चरणी आपली श्रद्धांजली समर्पित केली. रेश्मा फडतरे यांनी आपल्या मनोगतात कृष्णराव भेगडे हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलं. रेखा भेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भेगडे साहेबांच्या कार्याचा थोडक्यात आढावा सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर जगन्नाथ काळे यांनी स्वतःचे पुस्तक कृष्णराव भेगडे यांना भेट देताना त्यांनी लेखकाप्रती दाखवलेला आदर किती उच्च कोटीचा होता, हे आपल्या आदरांजलीपर मनोगतातून व्यक्त (Krishnarao Bhegde) केले.
अंकुश दाभाडे, रमेश फरताडे,बद्रीनारायण पाटील यांनी शोक भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप गाडेकर यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी (Krishnarao Bhegde) मानले.