मावळ ऑनलाईन –भाजीपाला मार्केटमध्ये पत्नी मुलांसह भाजीपाला खरेदी करत(Kiwale Crime News) असताना एका रिक्षाचालकाने मुलाच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम काळ्या दोऱ्यातून हिसकावले आणि चोरी करून पळून जात असताना बाजारातील लोक आणि गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. ही घटना मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सायंकाळी किवळे येथील के व्हीला सोसायटी समोरील भाजीपाला मार्केट येथे घडली.
याबाबत दत्तात्रय रामदार बेलकर (४१, किवळे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कैलास शामराव खाडे (२६, निगडी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे.
Nutan Engineering College : नूतन कॉलेजमध्ये “एॅडव्हान्स टेक्नॉलॉजीवर परिसंवादाचे आयोजन
Uddhav Thackeray:मतदान कुणाला जातं हेच कळत नाही! -उद्धव ठाकरे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी उज्वला मुलांसह किवळे येथील भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदी करत असताना, आरोपी कैलास खाडे याने फिर्यादीचा मुलगा सार्थक याच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे बदाम लबाडीच्या इराद्याने हिसकावले. चोरी करून पळून जात असताना बाजारातील लोक आणि गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला जागीच पकडले. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.