Team MyPuneCity –शेतातील विहिरीच्या कारणावरून तीन जणांनी (Khed Crime News)एका तरुणाला कुऱ्हाडीने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २७) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कोयाळी येथे घडली.
संपत रामभाऊ काळे (वय 39), भानुदास रामभाऊ काळे (वय 49) आणि एक महिला आरोपी (सर्व रा. काळे वस्ती, कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका महिलेने मंगळवारी (दि. 29) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Maval Online Launching : ‘एआय’च्या युगात माध्यमांपुढे सृजनशीलता आणि विश्वासार्हता टिकविण्याचे आव्हान – राजीव खांडेकर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मुलगा संतोष काळे हे दोघेजण त्यांच्या शेतात गेले होते. त्यावेळी आरोपींनी शेतातील विहिरीच्या कारणावरून आता तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून आरोपी संपत याने कुऱ्हाडीने, आरोपी भानुदास यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी या गेल्या असत्या त्यावेळी आरोपी भानुदास याच्या पत्नीने फिर्यादी यांच्या छातीत बुक्क्यांनी मारहाण केली. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.