situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khandala Highway : खंडाळा महामार्ग पोलिसांच्या मनमानी कारभारा विरोधात काँग्रेस व शिवसेनेच्या कडून रस्ता रोको आंदोलन

Published On:
Khandala Highway

Team My Pune City – पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा, खंडाळा शहरामध्ये खंडाळा महामार्ग पोलिसांकडून अक्षरशः ( Khandala Highway)पर्यटकांची लूटमार सुरू आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या खंडाळा एक्झिट या ठिकाणी लोणावळा, खंडाळा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची वाहने आडवत वाहनांमधील सर्व साहित्यांची तपासणी केली जाते, पर्यटकांची अंग झडती घेतली जाते.

कुटुंबीयांसह लोणावळा शहरांमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून कारवाईच्या नावाखाली पैसे उकळले जातात असा गंभीर आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर व शिवसेनेचे माजी पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी खंडाळा महामार्ग पोलिसांच्या आडमुठेपणाच्या विरोधात आज खंडाळा एक्झिट या ठिकाणी  गुरुवारी (दि.31) रास्ता रोको आंदोलन केले आहे.

Talegaon Dabhade Crime News : विद्यार्थ्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण

 कारवाईसाठी कॅमेरे असताना पोलिसांना  गाडया अडविण्याचा व पैसे घेण्याचा अधिकार कोणी दिला. त्यांच्यावर व त्यांना सोबत घेऊन पर्यटकांची लूट करणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का? असे प्रश्न कवीश्वर यांनी उपस्थित केले आहे. 

खंडाळा महामार्ग पोलिसांच्या या लूटमारीमुळे लोणावळा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून येथील व्यावसायिक देखील त्यामुळे हतबल झाले आहेत. पर्यटन स्थळांवर पर्यटकांना चांगल्या सुविधा द्या असे पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून सांगितले जात असताना शासनाचाच एक भाग असलेल्या पोलिसांकडून पर्यटकांना त्रास देण्याचे प्रकार लोणावळा खंडाळा शहरांमध्ये सुरू आहेत.

याविषयी बोलताना निखिल कवीश्वर म्हणाले, लोणावळा व खंडाळा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक वाहनांची व पर्यटकांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. अशा वारंवार तक्रारी आमच्याकडे येत आहेत. अनेक व्हिडिओ देखील आहेत. याबाबत खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वरिष्ठांसोबत आम्ही अनेक वेळा चर्चा केली, याबाबत त्यांना सूचित करून हे पॉईंट बंद करण्यासंदर्भात विनंती केली ( Khandala Highway)होती. लोणावळा उपविभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी देखील हे सर्व पॉईंट त्यांच्या कार्यकाळामध्ये ताकीद देऊन बंद केले होते.

मात्र साहेबांची बदली झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी खंडाळा महामार्ग पोलिसांकडून पर्यटक वाहने अडवण्याचे प्रकार सुरू झाले. लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशन लोणावळा रिक्षा असोसिएशन लोणावळा व्यापारी असोसिएशन व खंडाळा भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी या सर्वांनी याबाबत खंडाळा महामार्ग पोलिसांना अनेक वेळा विनंत्या करून देखील त्यांच्याकडून या ठिकाणी पर्यटक वाहनांची तपासणी व लुटमार ही काही थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे आज नाईलाजास्तव आम्हाला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवरून बोलताना आमच्याशी हा पॉईंट बंद करण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन या ठिकाणी उभे करू असा इशारा देखील कवीश्वर यांनी दिला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यावर ऑनलाइन दंड होत असताना येथे वेगळी तपासणी कशासाठी ( Khandala Highway) केली जाते.

Follow Us On