दहावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या आठ विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत, ग्रामपंचायत कार्ला यांचा स्तुत्य उपक्रम
मावळ ऑनलाईन – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत( Karla News) ग्रामपंचायत कार्ला यांच्यावतीने दहावी परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी तसेच एन एम एम एस व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ९० टक्के पेक्षा पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या ( Karla News) विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत असते . त्याच प्रमाणे कार्ला ग्रामपंचायत ने देखील विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या हेतूने दहावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन केले . ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळतील या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जाईल. हो आवाहन स्वीकार करत आठ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवत पाच हजार रुपये मानकरी ठरले.
PMC : पुणे महापालिकेचा गळती शोध पथक उपक्रम; अनधिकृत जोडण्यांवर कारवाईची मागणी
तसेंच आता पर्यंत दहावी चे रेकॉर्ड तोडेलेल्या तीन विदयार्थ्यांना शाळेतील ( Karla News) शिक्षक मच्छिन्द्र बारावकर यांनी प्रत्येकी पाच हजार रु असे पंधरा हजार असे एकूण पंचांवन हजार रु विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
तसेच मावळ तालुक्यात शिषवृत्ती परीक्षेत प्रथम आलेली ( Karla News) प्राची भानुसघरे यांच्यासह शिषवृत्ती पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक उमेश इंगूळकर, दहावी वर्गशिक्षक संजय हुलावळे, संगीता खराडे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचा ग्रामपंचायती याच्या वतीने भव्य सत्कार केला.
या वेळी सरपंच भारती मोरे, उपसरपंच अभिषेक जाधव, माजी सरपंच दिपाली हुलावळे, माजी उपसरपंच किरण हुलावळे, सदस्य सचिन हुलावळे,सदस्या उज्वला गायकवाड, वत्सला हुलावळे, सोनाली मोरे, पोलीस पाटील संजय जाधव, मुख्याध्यापक संजय वंजारे शाळेचे सर्व शिक्षक यांच्या सह कार्ला ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित ( Karla News) होते.