मावळ ऑनलाईन – कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत (Kamshet News) ७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा शुक्रवार दिनांक १५ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी आठ वाजता शाळेच्या मैदानावर स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
टाटा मोटर्स कर्मचारी पतसंस्थेचे संचालक व उपाध्यक्ष , लोहगड विसापूर विकास मंच प्रमुख सचिन ज्ञानेश्वर टेकावडे, वास्तु विशारद संघाचे स्वयंसेवक मयूर राजगुरव, निर्मल वारीचे संयोजक संतोष गोविंदराव लोणकर शाला समितीचे सदस्य धनंजयजी वाडेकर तसेच,विक्रमशेठ बाफना, युवा उद्योजक युवराज शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते शंकरनाना शिंदे,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीपजी वाजे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनिता देवरे या सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रमुख पाहुणे मयूर राजगुरव व सचिनजी टेकावडे यांच्या हस्ते ध्वज (Kamshet News) पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले .या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व कामशेत येथील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक मुख्याध्यापक प्रदीपजी वाजे (Kamshet News) सर यांनी केले .कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षक पंढरीनाथ वाडेकर सर यांनी करून दिला .जयश्री सांबरी , तन्मय पिचड, कोमल गावडे ,पूजा ठाकर व हिंदवी लोहार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे संतोष लोणकर यांनी सर्व प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
ध्वजाचा अर्थ, आपण सातशे वर्ष गुलामगिरी मध्ये कशाप्रकारे होतो हे त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले .प्रमुख पाहुणे सचिनजी टेकावडे यांनी (Kamshet News) आपल्या मनोगतातून लोहगड किल्ल्या विषयीचा इतिहास व लोहगड किल्ला युनोस्को च्या यादीमध्ये त्याची नोंद झाली . तसेच महाराष्ट्रातील इतर 11 किल्ल्यांची देखील नोंद घेण्यात आली आहे, असे आपल्या मनोगतातून आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.
आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून माननीय ऐश्वर्याताई भूषण रणदिवे आयुक्त मुंबई यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचनाई’ या पुस्तकाची मराठी व इंग्रजी आवृत्ती असलेली पुस्तके दिली त्यांचेही पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत देखील करण्यात आले. १३ ऑगस्ट व १४ ऑगस्ट रोजी शाळेमध्ये ध्वज फडकवण्यात आला. हर घर तिरंगा या कार्यक्रमांमध्ये शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक अजित डुंबरे यांनी (Kamshet News) केले.