मावळ ऑनलाईन – जमीन मोजणीच्या वादातून भावकीच्या(Kamshet Crime News ) दोन गटांमध्ये मारामारी झाली आहे यावरून कामशेत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना मंगळवारी (दि.22) दुपारी मावळातील बुधवाडी या गावात घडली आहे.
भरत हरिभाऊ गरुड यांनी जमिनीचे मोजणी करण्यासाठी माणसे बोलावली होती यावेळी जमीन मोजणीला अरविंद वसंत गरुड यांनी विरोध केला यावेळी त्यांच्या शाब्दिक वजाबाकी होऊन भरत गरुड व अरविंद गरुड यांच्यात आपापसात हालामारी झाली.
Bicycle rally : सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या सायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद
Hinjawadi IT Park : हिंजवडी आयटी पार्क ‘कोंडीमुक्त’ करण्यासाठी अतिरिक्त ‘वॉर्डन’
याप्रकरणी अरविंद गरुड यांनी ही कामशेत पोलिसांना फिर्यादी दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून शांताराम आनंदराव गरुड, हरिभाऊ आनंदराव गरुड, महेश दादासाहेब गरुड व श्रवण भरत गरुड,भरत हरिभाऊ गरुड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तक्रारीत अरविंद गरुड यांनी म्हटले आहे की भरत हरिभाऊ गरुड हे त्यांच्या माणसांना घेऊन तिथे जमिनीची मोजणी करण्यात आली होती मात्र अरुण गरुड यांनी त्यांना विरोध केला असता याचा राग मनात धरून भरत गरुड यांनी इतर त्यांची माणसे जमून अरविंद गरुड,त्यांचा मुलगा अविनाश गरुड व भाऊ आनंद गरुड यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
तर या विरोधात भरत गरुड यांनी देखील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून अरविंद वसंत गरुड, अनंता वसंत गरुड व अविनाश गरूड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी त्यांच्यावर तक्रारीमध्ये म्हटले आहे की ते जमीन मोजण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना जमीन मोजणीच्या कामात अडथळा निर्माण केला तसेच हरिभाऊ गरुड चा मुलगा व त्यांचे इतर सोबत असलेल्या दोघांना आरोपींनी लाकडी काठीने व लाथा बुक्क्याने मारहाणू करत गंभीर दुखापत केली.
यावरून कामशेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.