मावळ ऑनलाईन – कामशेत येथे उतारावर (Kamshet Crime News)पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला त्यामध्ये चालकाच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर झाला आहे. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी सात वाजता जय मल्हार हॉटेल जवळ घडला.
ऋषिकेश भाऊसाहेब भुगे ( वय 27 रा. भुगेवाडी, अहिल्यानगर) असे मयत चालकाचे नाव आहे.
Chikhali Residents : चिखली घरकुलवासीयांची घरपट्टी माफ करा!
Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!
मिळालेल्या माहितीनुसार, भुगे याच्या ताब्यातील (एम एच 16 डी पी 1711) टेम्पो मध्ये जून टायर घेऊन पुण्याच्या दिशेने जात होता. कामशेत जवळ उतारावर भुगे याचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो पलटी होत असताना भुगे याने खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला यावेळी टेम्पो अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर हा गंभीर जखमी झाला आहे. याचा पुढील तपास कामशेत पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत.