मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथे कै. पद्माकर प्रधान स्मृती मराठी सुगम संगीत ( Kalapini) स्पर्धेच्या स्पर्धकांसाठी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Adkar Foundation : ॲड. आव्हाडांप्रमाणे ज्ञानाधारित प्रकाशवाटेची गरज- भारत सासणे
स्पर्धकांना दर्जेदार सादरीकरणासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ( Kalapini) आयोजित या कार्यशाळेत डॉ. अनंत परांजपे, विनायक लिमये, निशा अभ्यंकर आणि मंगेश राजहंस यांनी सूर, भाव, शब्द, ताल, लय, गाण्याची निवड, माईक हाताळणी आणि सादरीकरणातील भाव व्यक्त करण्याच्या तंत्रांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
१५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या ( Kalapini) कार्यशाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांचाही सहभाग विशेष ठरला. स्पर्धकांनी या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढल्याचे आणि गीत निवडीपासून सादरीकरणापर्यंतच्या शंका दूर झाल्याचे सांगितले.
Bhagwan Shinde: विद्यार्थ्यांनी जुनी व नवीन अध्ययन पद्धती आत्मसात करून अभ्यास करावा- रो.भगवान शिंदे
स्पर्धा प्रमुख अशोक बकरे यांनी स्पर्धा शनिवार, १३ आणि रविवार, १४ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर यांनी केले, तर रुपाली पाटणकर, स्वाती इंगळे, सुचिता कुलकर्णी, सोनाली पडळकर, भाग्यश्री हरहरे, शिरीष जोशी, रामचंद्र रानडे आणि श्रीपाद बुरसे यांनी संयोजनाची जबाबदारी ( Kalapini) सांभाळली.