मावळ ऑनलाईन – कलापिनी सांस्कृतिक केंद्राच्या (Kalapini)वतीने गेली ४८ वर्षे तळेगाव व मावळ परिसरात संगीत स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमधून अनेक कलाकार तयार होऊन संगीत क्षेत्रात चमकले आहेत. स्पर्धेत आपली कला सादर करणारा स्पर्धक पुढे संगीताचा साधक व्हावा याकरिता त्याला योग्य प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचे कार्य कलापिनी सातत्याने करत आहे. आपल्यातील गायन कलेला उत्तम स्वर मंच मिळून देण्यासाठी त्वरित नाव नोंदणी करून स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे.
Crime News : कुनेगाव हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणातून तरुणाला मारहाण
यंदाही दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता संगीत कार्यशाळा आयोजित केली आहे. तरी कृपया सर्व सहभागींनी याचा लाभ घ्यावा आणि यंदा स्पर्धेसाठी ही कार्यशाळा अनिवार्य आहे. स्पर्धा दिनांक 12 13 व 14 सप्टेंबर 2025 रोजी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात होणार(Kalapini) आहे .या स्पर्धेसाठी पहिली ते दहावी या शालेय गटासाठी प्रवेश शुल्क रुपये 100 व युवक, प्रौढ व जेष्ठ गटांसाठी प्रवेश शुल्क दोनशे रुपये असणार आहे. तसेच प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर 2025 आहे.
Alandi : माऊलींच्या सुवर्ण महोत्सवी जन्मवर्षा निमित्त उद्या आळंदीत सुवर्ण कलशारोहण सोहळा
त्यानंतर मात्र शंभर रुपये विलंबशुल्कासह फक्त रविवार ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रवेश (Kalapini) दिला जाईल.
प्रवेशिका नोंदणीसाठी संपर्क श्रीपाद बुरसे. ८९७५७०९२३१
अशोक बकरे. ९४२३५०६४००
वैयक्तिक नावनोंदणी रामचंद्र रानडे यांचेकडे सायंकाळी ५ ते ६.३० या वेळात कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे करावी.