गेली अनेक वर्षे उद्योग धाम आणि विविध सोसायटीच्या गणपती उत्सवात कलापिनी संस्थेच्या कलाकारांचे ‘विविध गुण दर्शन कार्यक्रम सादर होत असतात.
ह्या वर्षी सुद्धा बालभवन, कुमार भवन आणि युवा मंच च्या कलाकारांनी आपली कला सादर केली.
मावळ ऑनलाईन –दर वर्षी प्रमाणे गणेश चतुर्थी दिवशी (Kalapini Ganesh Utsav )उद्योग धाम येथे कलापिनी च्या मुलांनी आणि उद्योगधाम येथील मुलांनी गाणी, नृत्य, नाटक, आणि नाट्यछटा अशी सुंदर कार्यक्रमाची मेजवानी प्रेक्षकांना दिली. उद्योगधामच्या कार्यकारिणीने या सगळ्या कार्यक्रमासाठी लागणारी व्यवस्था अतिशय उत्तम अशी केली होती.
गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री समर्थ सेवा समिती आणि योगीराज फाउंडेशन आयोजित बालमेळावा, योगीराज हॉल येथे आपल्या कलाकारांनी नृत्य, नाट्य छटा, समुहगीत व नाटक सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.तसेच योगीराज फाउंडेशन चे आशिष पाठक यांनी सर्वाना जेवणरुपी प्रसाद ठेवला होता.
गणेश उत्सवाच्या चौथ्या दिवशी लेक शोअर सोसायटी येथे देखील नाट्य छटा, नाटक,समुहगीत, नृत्य असे बहारदार सादरीकरण केले.


वरील तिन्ही कार्यक्रमांमध्ये सुरेल आवाजाचा बालगायक विवान रुपनवर याने गणेश वंदना गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, त्याला पेटीवर साथ दिली. शुभंकर घाणेकर आणि तबलयांची दमदार साथ श्रीहरी टिळेकर याने दिली.
बालभवनच्या मुलांनी सुंदर बालगीत आणि नाट्य छटा सादर केल्या, कुमार भवन च्या मुलांनी गुरुंनी दिला ज्ञानरूपी वसा हे समूहगीत सादर केले.
Vadgaon Maval Court : वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजुरी; इमारत बांधणीसाठी १०९ कोटी ८ लक्षांचा निधी
Ganesh Visrajan : गणेश विसर्जनानंतर मुर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास करता येणार नाही
श्री समर्थ शिष्य अज्ञान यांच्यावर आधारित सुंदर नाटिका कुमार भवन च्या मुलांनी सादर केली.नाट्य छटा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धाकांनी आपल्या नाट्य छटा सादर केल्या.
तसेच मंगेश पाडगांवकर यांच्या,’सांगा कस जगायचं? ‘या कवितेवर कुमारभवन व युवामंच च्या मुलांनी समूह गीत सादर केले.तर जान्हवी पावसकर आणि शांभवी जाधव हिने ‘चिऊताई चिऊताई दार उघड ‘या कवितेचे नाट्य रूपांतरचे छान सादरीकरण केले.
‘कोकणचा रुबाब भारी’ या नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
वरील तिन्ही ठिकाणी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आणि पुन्हा पुन्हा कलापिनीचे कार्यक्रम आमच्या इथे व्हावेत अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. सर्व कार्यक्रम बसविण्यासाठी डॉ. अनंत परांजपे, अंजली सहस्त्रबुद्धे, संदीप मनवरे, आणि विद्या अडसुळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग,विद्या अडसूळे,संदीप मनवरे यांनी उत्तम केले.



















