मावळ ऑनलाईन– कलापिनी बालभवन (Kalapini Bal Bhavan) केंद्राच्या जवळ एका संभाव्य मोठ्या दुर्घटनेपासून बचाव करण्यात आला. मागील आठवड्यात शुक्रवारी (दि.27 जून) केंद्र सुटण्याच्या वेळी कार्यकारिणी सदस्य आणि अभियंता सुजित मळ्ळी यांच्या सतर्कतेमुळे आणि तत्काळ कृतीमुळे ही घटना टळली.
घटना घडली तेव्हा सुजित मळ्ळी हे कलापिनीच्या (Kalapini Bal Bhavan)बाहेर उभे होते. त्याचवेळी एक कुत्रा बाहेरील खांबावर लघुशंका करताना अचानक थोडासा ढकलून दिल्या सारखा झाला, जणू काही त्याला विजेचा झटका बसला. हे दृश्य पाहून सुजित मळ्ळी यांनी शंका घेत त्वरित टेस्टरने खांबाची तपासणी केली. तपासणीत खांबात प्रचंड विद्युत प्रवाह उतरलेला असल्याचे लक्षात आले. सुजित मळ्ळी यांनी तातडीने ही माहिती महेश सोनपावले यांना दिली. त्यानंतर वायरमन संतोष हेटे यांना पाचारण करण्यात आले. संतोष हेटे यांनी त्वरेने घटनास्थळी येत विद्युत पुरवठा बंद करून संभाव्य जीवितहानी टाळली.
Murder : ठाकरसाई येथे डोक्यात कुदळ घालून सहकारी कामगाराचा खून

या सतर्कतेबद्दल आज (शुक्रवारी) सायंकाळी 5.15 वाजता कलापिनी केंद्रात (Kalapini Bal Bhavan) सुजित माळी, महेश सोनपावले आणि संतोष हेटे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बालभवनच्या प्रमुख मधुवंती रानडे यांनी केले आहे.