मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने ( Kabaddi Tournament) “ सतेज संघ,बाणेर यांच्या वतीने “ कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२५ व “ बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पुरुष व महिला “ स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात सतेज संघ विजेता व नांदेडचा एस.एम. पटेल स्पोर्टस फाऊंडेशन उपविजेता तर महिला विभागात राजमाता जिजाऊ विजेता तर महेशदादा स्पोर्टस संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, स्पर्धा आयोजक व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह व पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, क्रीडा ( Kabaddi Tournament) आयुक्त शितल तेली-उगले, पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, पुणे शहर युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे समिर चांदेर, पीडीसीसी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, कविता आल्हाट, नाना काटे, निर्मला नवले, ज्ञानेश्वर तापकीर, गजानन बालवडकर, रोहिणी चिमटे उपस्थित होते.
पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सरकार्यवाह दत्तात्रय झिंजुर्डे सर्व पदाधिकारी, यास्पर्धेचे निरिक्षक बजरंग परदेशी, पंच प्रमुख मालोजी भोसले, पुणे लीग स्पर्धेचे पंच प्रमुख इम्रान शेख, सहाय्यक अनिल यादव, आदी उपस्थित होते.
पुरुष विभागात झालेल्या अंतिम सामन्यात बाणेरच्या सतेज संघाने नांदेडच्या एस.एम.पटेल स्पोर्टस फाऊंडेशन संघावर ४०-२२ गुणांनी एकतर्फी विजय मिळवित स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मध्यंतराला सतेज संघाकडे २७-१२ गुणांची आघाडी होती. सतेज संघाच्या पृथ्वीराज शिंदे, सोहम मुजगल यांनी चौफेर आक्रमण करीत आपल्या संघाला विजय मिळवून ( Kabaddi Tournament) दिला. किरण मगर व सौरभ देशमुख यांनी सुरेख पकडी घेतल्या. एस.एस.पटेल स्पोर्टस फाऊंडेशनच्या आर्यन ढवळे, मोबीन शेख यांनी काहीसा प्रतिकार केला. तर वैभव मोरे याने पकडी केल्या.
Publication of a book : ‘छोट्या अणूची मोठी गोष्ट’तून माणूसपणाचीही मांडणी – डॉ. श्रीपाल सबनीस
अत्यंत दोलायमान झालेल्या चुशीच्या सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन संघावर सुवर्ण चढाईत २७-२६ असा विजय मिळविला. मध्यंतराला १०-१३ असा पिछाडीवर होता. शेवटच्या मिनिटापर्यंत अत्यंत चुरशीच्याव दोलायमान अवस्थेत हा सामना ( Kabaddi Tournament) होता. शेवटच्या मिनिटात हा सामना २१-२१ अशा समान गुणांवर संपला. त्यानंतर दोन्ही संघाना नियमानुसार पाच पाच चढाया दिल्या. दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांनी एक एक गुण देण्याची रणनिती आखल्याचे दिसून आले.
परिणामी पाच पाच चढायांमध्येही दोन्ही संघानी २६-२६ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सरपंच गजानन पाटील यांनी दोन्ही संघनायकांना बोलावून पुन्हा नाणेफेक घेतली. ही नाणेफेक महेशदादा स्पोर्टस संघाने जिंकली व खेळाडूंनी एकच जल्लोश केला. महेशदादा स्पोर्टस संघाच्या आर्या पाटील हिने अपेक्षे प्रमाणे चढाई केली व तिची राजमाता जिजाऊच्या कोपरा रक्षक असलेल्या कोमल आवळे हिने चवडा पकड घेत पकड केली.
तिला मध्यरक्षक असलेल्या प्रतिक्षा लांडगे व ऋतुजा निगडे यांनी मदत करीत ( Kabaddi Tournament) पकड केली व आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात राजमाता जिजाऊ संघाच्या निकिता पडवळ व रेखा सावंत यांनी चांगला प्रतिकार केला. तर कोमल आवळे व प्रतिक्षा लांडगे यांनी सुरेख पकडी केल्या.
महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशनच्या आर्या पाटील व अर्चना झोरी यांनी सामन्यावर सुरवातीपासुन वर्चस्व ढेवले होते. मात्र शेवटच्या मिनिटात हा सामना समान गुणांवर( Kabaddi Tournament) संपला. त्यामुळे त्यांना विजयासाठी झगडावे लागले. दिव्या गोगावले हिने काही उत्कष्ट पकडी केल्या. या सामन्यासाठी वर्षा मुंडे व सुजित इंगवले यांनी सामनाधिकारी म्हणून काम पाहिले.