मावळ ऑनलाईन – सांगवी गावचे ग्रामदैवत आणि मावळ तालुक्याचे ( Jakhmata Devi ) श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र श्रीपोटोबा महाराजांची बहीण म्हणून ओळख असलेल्या श्री जाखमाता देवीची वज्रलेप करून नुकतीच धार्मिक विधीने पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली.इंद्रायणी नदीच्या तीरावर श्री जाखमाता देवीचे पुरातन मंदिर असून, या मंदिराचा जीर्णोद्धार आणि सभामंडप कामाचा भूमिपूजन समारंभ काही दिवसांपूर्वी झाला.
यावेळी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य महादू खांदवे,बारकू खांदवे, मारुती तोडकर, युवराज तोडकर, वसंत खांदवे,भाऊसाहेब जाधव, बबन खांदवे,सोपान खांदवे,सुदाम तोडकर, मारुती तोडकर, गोपीचंद लालगुडे, रघुनाथ तोडकर,गुलाब खांदवे,ज्ञानेश्वर खांदवे,यशवंत खांदवे, गणेश लालगुडे,माजी उपसरपंच काशिनाथ तोडकर,छबुराव तोडकर,अनिल खांदवे, नवनाथ तोडकर,ऋषिकेश लालगुडे, पांडुरंग तोडकर,गोरक्षनाथ तोडकर, मनोज खांदवे सुनील खांदवे, शरद खांदवे, बाळासाहेब ( Jakhmata Devi ) पवार तसेच माजी सरपंच मनीषा लालगुडे,माजी उपसरपंच कुंदा खांदवे आदींसह महिला उपस्थित होत्या.
आमदार सुनील शेळके यांच्या निधीतून सभामंडपाचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी देवीची मूळ मूर्तीही नदीपात्रापासून उंचीवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मूळ मूर्तीची मळी काढून तिच्यावर वज्रलेप करण्यात आला. आगामी पंधरा दिवसांवर असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वज्रलेप केलेल्या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा करून सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली.
Adkar Foundation : ॲड. आव्हाडांप्रमाणे ज्ञानाधारित प्रकाशवाटेची गरज- भारत सासणे
श्री जाखमाता देवी हे जागृत देवस्थान मानले जात असून, तीर्थक्षेत्र पोटोबा महाराजांची ( Jakhmata Devi ) बहीण म्हणून पुरातन काळापासून भाविकांची श्रद्धा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पोटोबा महाराजांची पालखी जाखमाता मंदिरात येते.येथे पोटोबा महाराजांच्या मुखवट्यांना इंद्रायणी नदीत स्नान घालून पोटोबा महाराज व जाखमाता देवी यांची बहीण-भाऊ भेट ही होते. ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.
युवा नेते विकास लालगुडे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विशेषतः वडगावचे माजी सरपंच बाळासाहेब ढोरे, स्व पै केशवराव ढोरे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित ( Jakhmata Devi ) होता.