मावळ ऑनलाईन –जाधववाडी येथील एका कंपनीतून लोखंडी साहित्य चोरून नेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (13 जुलै) सकाळी उघडकीस आली.
रितेश राजकुमार सोनवणे (22, माळवाडी, मावळ), कार्तिक निळू रंदिल (19, इंदोरी, मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सतीश पांडुरंग भट (55, वडगाव मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
MLA Mahesh Landge : उद्योग क्षेत्रातून टॅक्स घेता, मग सुविधा का देत नाही?
Lohagad Fort : लोहगड किल्ल्याच्या जागतिक वारसा नोंदीसाठी संपर्क संस्थेचा खारीचा वाटा -अमित कुमार बॅनर्जी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश हे जाधववाडी येथील मंगलोर मिनरल प्रा ली या कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीतून आरोपींनी 13 हजार रुपये किमतीचे पार्ट चोरून नेले. याबाबत तक्रार केली असता पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.