situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Indrayani Vidya Mandir : विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये हवा मुक्त संवाद – चंद्रकांत शेटे

Published On:
Indrayani Vidya Mandir

विद्यार्थ्यांचे जल्लोषात व पुष्पवृष्टी करत स्वागत…

मावळ ऑनलाईन – “शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनाचा विचार( Indrayani Vidya Mandir) करून त्यांच्याशी मुक्त संवाद साधायला हवा! असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करून,पेन व पेढे देऊन स्वागत करण्यात आले.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या सभागृहामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शेटे बोलत होते.

Pimpri Chinchwad Crime News 06 August 2025 : रावेतमध्ये कोयत्याचा धाक दाखवत लुटमार

यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, पर्यवेक्षिका प्रा.उज्वला दिसले,स्टाफ सेक्रेटरी प्रा. राजाराम डोके, विज्ञान विभागप्रमुख प्रा.यु.एस.खाडप, वाणिज्य विभागप्रमुख प्रा.वीणा भेगडे, कला विभागप्रमुख प्रा.के. डी.जाधव, तंत्रशिक्षण विभागप्रमुख प्रा.नीता आहिरे, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेचे कार्यवाह शेटे पुढे बोलताना म्हणाले की, संवादातून सहजगत्या ( Indrayani Vidya Mandir)
विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत सहज पोहोचता येते. महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा महत्वाचा टप्पा असतो. हे जीवन तुमचे उद्याचे आयुष्य आणि भविष्य घडवत असते. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या मदतीने आपल्या आयुष्याचा लाईट हाऊस शोधला पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.

उपप्राचार्य प्राध्यापक संदीप भोसले यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सांगत संपूर्ण वार्षिक शैक्षणिक वर्षाचे नियोजन आणि विविध उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

Kamshet Crime News : कामशेत येथे नागरिकांनीच पकडले चोराला

पर्यवेक्षिका प्रा.उज्ज्वला दिसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिस्तीचे महत्व पटवून दिले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक विभागातील दोन दोन विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विज्ञान विभागप्रमुख यु.एस.खाडप यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून विज्ञान विभागाचे महत्व आणि मागील वर्षाची निकालाची परंपरा स्पष्ट केली. प्रा. दिसले मॅडम( Indrayani Vidya Mandir) यांनी वाणिज्य विभागाची ओळख करून वाणिज्य विभागातील महाविद्यालय आणि भविष्यातील संधी सांगत वाणिज्य शाखेचे महत्त्व पटवून दिले. प्रा. के. डी.जाधव यांनी कला विभागाचे, प्राध्यापक नीता अहिरे यांनी तंत्रशिक्षण विभागातील विविध संधींचा आढावा घेतला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन वाटचाल करावी. शिक्षकांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. तसेच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. महाविद्यालयात नित्यनेमाने दररोज हजर राहावे व उत्तम नागरिक बनवून राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे. असे सांगत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी ( Indrayani Vidya Mandir) प्रा.प्राची भेगडे, प्रा .शैलजा मतकर, प्रा.राधिका साठे, प्रा. घोडके, प्रा.नाटकर, प्रा. कुटे,प्रा.खेंगले,प्रा.भुजबळ, इतर सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मेघा कुटे यांनी केले. आभार प्रा.प्राची भेगडे यांनी मानले.

Follow Us On