मावळ ऑनलाईन – पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतरशालेय मावळ तालुका स्तरीय मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान विभाग) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य संदीप भोसले यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामागे गोरख काकडे व क्रीडा शिक्षक योगेश घोडके यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्यांची यादी
सिद्धेश गिरमाजी पवार – तृतीय क्रमांक (1500 मीटर धावणे)
पुष्कर संदीप घारे – प्रथम क्रमांक (800 मीटर धावणे), प्रथम क्रमांक (100×400 रिले)
संकल्प दीपक ढोरे, विनायक गणेश ठाकर, आदित्य भागवत शिंदे, कार्तिक संजय चव्हाण, अभिषेक कैलास शेवकर – प्रथम क्रमांक (4×400 रिले)
मानव कैलास पानसरे, पृथ्वीराज काळूराम पवार, आदित्य भागवत शिंदे, हर्षल नवनाथ अंभोरे, अनिश निलेश गराडे – प्रथम क्रमांक (4×400 रिले)
हर्षल नवनाथ अंभोरे – द्वितीय क्रमांक (गोळाफेक), तृतीय क्रमांक (1500 मीटर धावणे)
विनायक गणेश ठाकर – द्वितीय क्रमांक (200 मीटर धावणे)
विवेक मच्छिंद्र ठोंबरे – तृतीय क्रमांक (उंच उडी)
संकल्प दीपक ढोरे – तृतीय क्रमांक (लांब उडी)
पुष्कर संदीप घारे – तृतीय क्रमांक (3000 मीटर धावणे)
अनिकेत मच्छिंद्र नायकवडी – तृतीय क्रमांक (1500 मीटर धावणे)
या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही ते उत्तम कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे