मावळ ऑनलाईन – तळेगाव शहरात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन( Independence day) उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, बँका व संघटनांतर्फे ध्वजारोहण संपन्न झाले.
नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक ( Independence day)यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. इंद्रायणी महाविद्यालयात रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष केशव मनगे, तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये डॉ. शशिकांत पवार, नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योजक स्वामी नाथन, तर भाजपा कार्यालयात शहराध्यक्ष चिराग खांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण ( Independence day)झाले.
तळेगाव शहर विकास समितीत समाजसेवक बाळासाहेब पानसरे, नवीन समर्थ विद्यालयात रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे, ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिरात शालेय समिती सदस्य अशोक काळोखे, सरस्वती विद्यामंदिरात संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, तसेच कृष्णराव भेगडे विद्यालयात रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष श्रीशैल मेंथे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

बालविकास विद्यालयात लेफ्टनंट कर्नल ऋषिकेश खांडगे, आदर्श विद्यामंदिरात यादवेंद्र खळदे, जैन शाळेत विद्यार्थिनी अंजली विशाल भोर (एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक), तर सह्याद्री विद्यालयात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वज( Independence day) फडकविण्यात आला.
Crime News : सोनसाखळी चोरट्याला अटक, 15 गुन्हे उघडकीस
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, मामासाहेब खांडगे विद्यालयात संस्थापक अध्यक्ष गणेश खांडगे, स्वामी विवेकानंद विद्यालयात रोटरी क्लब ऑफ एमआयडीसीचे अध्यक्ष प्रवीण भोसले, सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेत अध्यक्ष बाळासाहेब राजाराम दाभाडे, तसेच श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेत संस्थापक बबनराव भेगडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
याशिवाय विद्या विहार कॉलनीत सुभेदार विष्णू पठाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तसेच नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या हस्ते स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात ( Independence day) आला.