मावळ ऑनलाईन –तळेगाव शहरातील मानाचा तिसरा गणपती ( Health camp) असलेल्या तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या आरोग्य शिबीरात ईसीजी, रक्त तपासण्या, रक्त दाब व तपासणी करण्यात आली व पुढील उपचारासाठी हरनेश्वर हॉस्पिटलमध्ये ( Health camp) बोलवण्यात आले. मायमर मेडिकल कॉलेज व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील गरवारे ब्लड बॅक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीरामध्ये अनेक तरुणांनी रक्तदान केले.
Liquor sale : गणेशोत्सव काळातील मद्यविक्रीवरील संपूर्ण दहा दिवसांची बंदी नाही – उच्च न्यायालय
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय शेलार. महेंद्र कसाबी. समिर टेकवडे. अनिकेत वैरागी. अतुल जगनाडे. मंदार कसाबी. गौरव क्षिरसागर. ओमकार क्षिरसागर. श्रीकांत शेडगे. तुषार जगनाडे. मिलिंद कसाबी. आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण क्षिरसागर व विजय केदारी ( Health camp) यांनी दिली.