situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Har Ghar Triranga campaign : ‘हर घर तिरंगा’ अभियानास वडगाव येथे उर्त्स्फूत प्रतिसाद

Published On:
Triranga

वडगाव शहरातील 4 हजार 400 नागरिकांचा सहभाग

मावळ ऑनलाईन – ‘हर घर तिरंगा’ अभियानात वडगाव नगरपंचायतीच्यावतीने ( Har Ghar Triranga campaign)आयोजित विविध देशभक्तीपर, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व आदी जनजागृतीपर उपक्रमास उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला असून शहरातील 4 हजार 400 नागरिकांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांनी दिली.

Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ येथे 1 हजार 450 विद्यार्थ्यांनी स्वच्छता शपथ व तिरंगा शपथ घेतली. न्यू इंग्लिश स्कूल, रमेश कुमार सहानी स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सर्व जिल्हा परिषद शाळेच्यावतीने नागरिकांना अभियानात सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात करण्यात आले. पर्यावरण पूरक तिरंगा राखी स्पर्धा, तिरंगा रांगोळी व चित्रकला स्पर्धा, तिरंगा प्रश्नमंजुषा, तिरंगा दौड, पथनाट्य, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, भारतीय जवानांच्या साठी पत्र लेखन, तिरंगा सेल्फी आदी उपक्रम राबविण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल रयत शिक्षण संस्थेच्या पर्यावरण पूरक राखी स्पर्धेत ( Har Ghar Triranga campaign)सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Nutan Maharashtra Engineering College : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ७९ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा

नगरपंचायत कार्यालय येथील तिरंगा सेल्फी पाँईटवर सुमारे 150 नागरिक व कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेतला. सर्व शाळा व महाविद्यालयाने 500 तिरंगा झेंडे वाटप केले. जिल्हा परिषद शाळा केशवनगर, न्यू इंग्लिश स्कूल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचा प्रवासाबाबतचा लघु चित्रपट दाखवून यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुमारे 1 हजार 800 विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कूल येथे तिरंगा चित्रकला स्पर्धेमध्ये सुमारे 250 विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळा केशवनगर येथे तिरंगा राखी निर्मिती स्पर्धेमध्ये सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


जिल्हा परिषद शाळा पंचायत समिती शाळेच्यावतीने आयोजित तिरंगा प्रभात फेरीमध्ये सुमारे 250 विद्यार्थी सहभागी झाले. शहरातील नागरिकांना राष्ट्रध्वज मोफत वाटप करुन नागरिकांमध्ये तिरंगा ध्वज फडकवणे व अभियानाची जनजागृती करण्यात आली. शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन व एलईडीस्क्रीनद्वारे हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता अभियानाविषयी जनजागृती करण्यात आली. येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी शहरातून भव्य तिरंगा रॅलीचे व शहरात पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ निकम यांनी दिली( Har Ghar Triranga campaign) आहे.

Follow Us On