मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कचरेवाडी येथील ( Gopichand Maharaj Kachre ) एक अभ्यासू कीर्तनकार,प्रवचनकार व व्याख्याते हभप.गोपीचंद महाराज कचरे यांना वारकरी संप्रदायात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर याच्या वतीने राज्यस्तरीय ज्ञानमाऊली पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कचरे महाराजांना आपले वडील व आजोबांकडून वारकरी सांप्रदायाचे संस्कार मिळाले. परिवारात चार पिढ्यांपासून वारकरी सांप्रदायाचे कार्य सुरू आहे.

ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाराजांनी एम.काॅम,एम.ए,पेट.पीएच.डी इथपर्यंतचा शैक्षणिक प्रवास केला ते अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत ( Gopichand Maharaj Kachre ) आहे.
Jedhe Chowk : स्वारगेट येथील जेधे चौक अंडरपास तीन दिवस बंद; वाहतुकीत मोठ्या अडचणीची शक्यता
पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी त्यांचे वडील ह.भ.प.एकनाथ महाराज कचरे, पत्नी सरपंच वर्षाताई गोपीचंद कचरे तसेच राज्यभरातील अनेक मान्यवर उपस्थित ( Gopichand Maharaj Kachre ) होते.