मावळ ऑनलाईन –तिरंगा हमारे देश की आन-बान और शान है ,असे प्रतिपादन सी आर पी एफ 242 बटालियनचे कृष्णकांत झा सर यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद व गोल्डन रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिरंगा रॅलीच्या समारोप प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. तिरंगा रॅलीचे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी देशभक्तीच्या घोषणा देऊन जोरदार उस्फूर्त स्वागत केले. डिस्ट्रिक्ट 3131 चे PR डायरेक्टर नितीन मुळे यांनी तिरंगा रॅलीस शुभेच्छा देऊन हिरवा कंदील दाखवला.
Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025 : बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न
याप्रसंगी आमदार सुनील शेळके यांचे वडील शंकररावजी शेळके,गोल्डन रोटरीचे किरण ओसवाल,नगरपालिकेच्या अधिकारी कल्याणी लाडे,गोल्डन रोटरीचे बसप्पा भंडारी,धनश्री काळे,दीक्षा वाईकर,सुजाता देव,कविता खोल्लम हे उपस्थित होते. याप्रसंगी गोल्डन रोटरीचे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी रोटरी गोल्डन च्या कार्याचा आढावा घेतला व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित सर्व विद्यार्थी,तळेगाव शहरातील नागरिक व जवानांना तिरंगा ध्वजाचा सन्मान ठेवावा अशी शपथ देण्यात आली.सिद्धी कम्युनिकेशनचे बाबा चौरे यांच्या तर्फे या रॅलीचे फटाके वाजवून व पुष्पवृष्टी उधळून जोरदार स्वागत आमदार शेळके यांच्या ऑफिस समोर करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे सौ वैशाली खळदे,सौ शोभाताई परदेशी,कमलाताई देशमाने,आशाताई किल्लेवाला यांनी औक्षण केले याप्रसंगी नितीन खळदे बाळासाहेब लोणकर,तुषार खेरडे,विनायक चौरे,सुरेश शिंदे सिद्धी कम्युनिकेशनचा सर्व स्टाफ हे उपस्थित होते.
तळेगाव शहरातील मंत्रा सिटी या ठिकाणाहून रॅलीस सुरुवात झाली तळेगाव शहरातील बीएसएनएल ऑफिस, मामासाहेब खांडगे चौक,खांडगे पेट्रोल पंप,आमदार सुनील शेळके यांचे ऑफिस,बेटी बचाव बेटी पढाव या ठिकाणाहून मारुती मंदिर नगरपालिका या ठिकाणी समारोप करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ मेहता,विकी बेलेकर,प्रदीप मुंगसे,दिनेश चिखले,चेतन पटवा,विजय गोपाळे यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी प्रकल्प प्रमुख रितेश फाकटकर यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत ताये यांनी केले.