मावळ ऑनलाईन – रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व जैन सोशल ग्रुप ( Golden Rotary)आयोजित जय बजरंग तरुण मंडळाच्या सहकार्याने व तळेगाव जनरल हॉस्पिटल M.I.M.E.R मेडिकल कॉलेजच्या सौजन्याने भव्य मोफत आरोग्य तपासणी,रोग निदान शिबिर व मोतीबिंदू तपासणी व मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर हा कार्यक्रम दिनांक 30 ऑगस्ट 2025 ला सकाळी 10 ते 2 राजेंद्र चौक,जय बजरंग तरुण मंडळ येथे होणार आहे.

Rashi Bhavishya 29 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
कार्यक्रमास वैद्यकीय महाविद्यालयाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालक डॉ सुचित्राताई नांगरे,माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल,डिस्टिक मेडिकल कमिटी चेअरमन डॉ नेहा कुलकर्णी,वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दर्पण महेश गौरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ( Golden Rotary) राहणार आहेत.
तळेगाव शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रो. संतोष परदेशी,श्री. हितेश राठोड,श्री. अजिंक्य कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख रो. किरण ओसवाल व सहप्रकल्प प्रमुख श्री. विनोद राठोड यांनी केले ( Golden Rotary) आहे.