मावळ ऑनलाईन – शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव ( Ganeshotsav) यंदा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक विविध उपक्रमांनी रंगतदार झाला आहे. शहरात एकूण ३० गणेश मंडळे उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असून ग्रामदैवत श्री तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज संस्थानचा मानाचा पहिला गणपती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.


पोटोबा महाराज देवस्थानात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली( Ganeshotsav) असून दररोज आरती, अथर्वशीर्ष पठण व भजन सेवा आयोजित केली आहे. यात ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, तुळजाई महिला भजनी मंडळ, मुकाई भजनी मंडळ, मोरया भजनी मंडळ आणि श्री काकड आरती भजनी मंडळ सहभाग घेणार आहेत. तर नेत्र शिबिर त्यानिमित्त कै सोपानराव म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप होणार आहेत अशी माहिती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रवींद्र म्हाळसकर यांनी दिली तसेचनंदकुमार जाधव,ॲड अजित वहिले, नितीन भोकसे, तुषार वहिले, पप्पू ढोरे, गणेश अर्जुन ढोरे, नितीन चव्हाण, संतोष खैरे, सुहास विनोदे, भाऊसाहेब ढोरे आदी कार्यकर्त्यांनी संयोजन केले आहे.

दरम्यान, जय जवान जय किसान मित्र मंडळ यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असून सामाजिक उपक्रमांची रेलचेल ठेवली आहे. मंडळाचे मार्गदर्शक सोमनाथ ढोरे व अध्यक्ष गणेश वहिले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर, सर्वरोग निदान शिबिर, हभप संग्राम महाराज भंडारे यांचे कीर्तन, महिलांसाठी लकी ड्रॉ, अथर्वशीर्ष पठण, बालजत्रा, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन,भजन स्पर्धा तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला जाणार( Ganeshotsav) आहे.
तसेच नवचैतन्य तरुण मंडळ ५१ वे वर्ष साजरे करीत आहे. मंडळाचे अध्यक्ष संतोष निवृत्ती म्हाळसकर यांनी सांगितल्याप्रमाणे आरोग्य शिबिर, तुळजाई भजनी मंडळाची सेवा, वृक्षारोपण उपक्रम तसेच श्री गणेश विसर्जनावेळी १५० बालवारकऱ्यांची भजन सेवा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन विकी म्हाळसकर, प्रवीण म्हाळसकर, आकाश म्हाळसकर, गणेश भोर, सुरेश म्हाळसकर आदी पदाधिकाऱ्यांनी केले ( Ganeshotsav) आहे.