मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान ( Ganeshotsav)व जय बजरंग तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतीसह शहरातील सुमारे ३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणपतींचे मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात आगमन झाले.
Pune: बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलला सुरुवात
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र म्हाळसकर, देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे,उद्योजक आशिष म्हाळसकर,यांच्या हस्ते ( Ganeshotsav)प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
याप्रसंगी विश्वस्त गणेश आप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर,अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, ॲड अशोक ढमाले, ॲड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनीता कुडे उत्सव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय बजरंग तालीम मंडळांमध्ये उमेश ढोरे, मंगेश तुमकर, अमित मुसळे, सागर बरदाडे, मुकुंद वाळुंज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात( Ganeshotsav) आली.
सार्वजनिक मंडळांनी काढली मिरवणूक
याशिवाय जय मल्हार ग्रुप, बालविकास मित्रमंडळ,गणेश तरुण मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ,जय जवान जय किसान मित्र मंडळ, कानिफनाथ तरुण मंडळ,अष्टविनायक मित्रमंडळ, साईनाथ तरुण मंडळ, नवचैतन्य तरुण मंडळ,श्रीराम मित्रमंडळ,जयहिंद तरुण मंडळ, आदर्श तरुण मंडळ,क्रांती मित्र मंडळ,ओंकार मित्र मंडळ,योगेश्वर प्रतिष्ठान,पंचमुखी मित्र मंडळ, विजयनगर मित्र मंडळ, दिग्विजय मित्र मंडळ,माळीनगर मित्र मंडळ, शिवशंभो तरुण मंडळ, इंद्रायणी तरुण मंडळ, शितळादेवी,मित्र मंडळ वक्रतुंड मित्र मंडळ,भैरवनाथ मित्र मंडळ,एकवीरा मित्र मंडळ आदी मंडळांनी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली.
या प्रसंगी जय मल्हार ग्रुप गणपती ( Ganeshotsav) स्थापना झाली व वसतिगृहातील मुलांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी धान्यवाटप केले.