मावळ ऑनलाईन – ओवळे गावातील म्हसोबावाडीतील गौरी-गणपतींचे ( Ganeshostav ) भक्तिमय वातावरणात ,ढोल-ताशांच्या गजरात तसेच गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या ,असा जयघोष करत विसर्जन करण्यात आले.
गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशाच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आर्जव करीत ओवळेरांनी गणेशाला निरोप दिला. गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी विसर्जनस्थळाच्या दिशेने गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आली होती. ढोल-ताशाचा गजर, फटाक्यांची आतशबाजी आणि गणेश नामाचा जप करीत भाविक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले ( Ganeshostav ) होते.
Lonavala Crime News : लोणावळा शहरात अल्पवयीन मुलावर 18 वर्षीय तरुणाकडून बलात्कार
पावसातही गणेशभक्तांचा उत्साह कायम होता. गणरायांच्या दर्शनासाठी गावातील अनेक लोक आले होते. बहुसंख्य नागरिक गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आले होते.यावेळी ओवळे गावातील अनेक ग्रामस्थ,महिला,पुरुष,तरूण-तरूणी,लहान मुलेमुली उपस्थित ( Ganeshostav ) होते.