मावळ ऑनलाईन –गहुंजे परिसरात शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या(Gahunje) एका १९ वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अचानक पाण्याची खोली वाढल्यामुळे तो बाहेर येऊ शकला नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाची ओळख रोहन ऊमेश रॉय (वय १९, रा. देहूरोड) अशी झाली आहे. या घटनेची नोंद परंदवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
Abhang English Medium School: कृतियुक्त,आनंददायी गणिताचे शिक्षण देणारा उपक्रम शिक्षणप्रणालीसाठी आदर्श
Lonikand Crime News : लोणीकंद येथे युवकाकडून २२ लाखांहून अधिक किमतीचा अफू जप्त
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या बचाव पथकातील निलेश गराडे, गणेश गायकवाड, अनिश गराडे, राजू बांडगे, विनय सावंत, भास्कर माळी (मामा), कमलेश राक्षे, अनिल आंद्रे, हिरामण आगळे व प्रतीक कुंभार या स्वयंसेवकांनी घटनास्थळी मोठ्या प्रयत्नांनंतर रोहनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, पुढील तपास सुरू आहे.