मावळ ऑनलाईन – बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार ( Fraud) करून आणि खोटे नाव वापरून एका महिलेची जमीन बेकायदेशीरपणे दुसऱ्या व्यक्तीला विकून तिची फसवणूक करण्यात आली. ही घटना १ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान तळेगाव दाभाडे येथे घडली.
या बाबत महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात ६ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर दशरथ काजळे (चिखलसे, कामशेत, ता. मावळ), देवानंद मंगल उपाध्याय (पुनावळे, ता. हवेली), दोन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Fraud) आहे.
PMC : महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या खोट्या नावाने (वर्षा सुनील पुराणिक) आणि तिच्या भावाच्या खोट्या नावाने (आशुतोष विवेक क्षीरसागर) बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार केले. ही बनावट कागदपत्रे तलाठी कार्यालयात सादर करून वारस नोंदणी केली आणि त्यानंतर ती जमीन आरोपी समीर आणि देवानंद यांना विकून फिर्यादीची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत ( Fraud) आहेत.