मावळ ऑनलाईन – एका महिलेची ऑनलाइन शेअर खरेदीच्या ( Fraud ) नावाखाली नऊ लाख ४० हजार ४०६ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २१ मे २०२५ ते १८ जून २०२५ दरम्यान साई प्लॅनेट, शिंदे पेट्रोल पंपाजवळ, देहुरोड येथे घडली.
Rakshabandhan : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जवानांसाठी पाठवल्या राख्या
याबाबत एका महिलेने शुक्रवारी (दि. ८) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विविध मोबाइल धारक, बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा ( Fraud ) दाखल केला आहे.
Dog attack : वडगाव मावळ येथे कुत्र्याच्या हल्ल्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्रिगेना या मोबाइल अॅपद्वारे कमी दरात शेअर्स खरेदी करण्याचे आश्वासन देत फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून विविध बँक खात्यांवर नऊ लाख ४० हजार ४०६ रुपयांची रक्कम जमा करून घेतली. परंतु गुंतवलेली रक्कम परत मागितल्यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणाचा अधिक तपास देहुरोड ( Fraud ) पोलीस करीत आहेत.