मावळ ऑनलाईन न्यूज : फ्लॅट विक्रीच्या आमिषाने तब्बल ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार माण (ता. मुळशी) येथे उघडकीस आला आहे. (Flat Sale Scam) ही घटना ११ फेब्रुवारी २०२४ ते १७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडली असून १ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकरण नोंदविण्यात आले.
Ganesh Kale Murder : गणेश काळेचा गोळ्या व कोयत्याने निर्घृण खून, चौघांना अटक
फिर्यादी महिला (वय ५१, नवी सांगवी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक रमेश मोरे, (Flat Sale Scam) जितेंद्र रमेश मोरे आणि एका महिला आरोपी (भुगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी माण येथील मल्हार पार्क येथील लेआउटमधील फ्लॅट क्रमांक ४ आणि प्लॉट क्रमांक ९ हे २२ लाख रुपये प्रति गुंठा दराने विकण्याचे (Flat Sale Scam) आश्वासन देत फिर्यादी आणि साक्षीदार प्रतीक्षा वाघ यांच्याकडून ४९ लाख रुपये घेतले. मात्र, फ्लॅट न देता पैसे अपहार करून पोस्ट डेटेड चेक दिला. तो चेक बँकेत वटला नसल्याने फसवणूक उघड झाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.























