मावळ ऑनलाईन – नाणोली येथील फिरंगाई डोंगरावरील ( Firangayee Devi) फिरंगाई देवी मंदिरात माळवाडीच्या सरपंच पल्लवी दाभाडे व त्यांचे पती संपत दाभाडे या उभयंतांच्या हस्ते सोमवारी (दि२२) सकाळी देवीचा अभिषेक व घटस्थापना व मारुती करण्यात आली.
यावेळी किसन लोंढे,दत्ता मांजरे,चंद्रकांत लोंढे,खंडू जगताप,दिनेश लोंढे,मारुती लोंढे,खंडू भोसले,आकाश लोंढेसह फिरंगाई देवी नवरात्र उत्सव कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shardiya Navratri 2025 : लोणावळा-खंडाळ्यात नवरात्र उत्सवाची थाटामाटात सुरुवात; एकवीरा व वाघजाई देवींची घटस्थापना
या नवरात्र उत्सव काळात रोज संध्याकाळी ८:१५ वाजता तसेच सकाळी ७:१५ वाजता महाआरती होणार आहे. संध्याकाळी महाआरतीनंतर( Firangayee Devi) महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. रोज रात्री ९ ते ११ जागर होणार आहे.

या नवरात्र उत्सव काळात माजी उपसरपंच प्रशांत भागवत, मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव, उद्योजक अमोल ढाकणे व अमोल साठे, सहकार महर्षी माऊली दाभाडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते महाआरती होणार आहे.
Maza Bappa Gharoghari : ‘माझा बाप्पा घरोघरी’ स्पर्धेतील विजेत्यांनी जिंकली नारायण पेठ साडी
देवीच्या महाआरती व महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही उत्सव समिती संयोजकांकडून करण्यात आले ( Firangayee Devi) आहे.