मावळ ऑनलाईन – वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून ( Family Land Dispute) भावानेच भावावर विळ्याने हल्ला केला. यामध्ये भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ओझर्डे (ता. मावळ) येथे घडली.
तुषार दत्तू धामणकर (वय ४४, रा. उसे, ता. मावळ, जि. पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बाळू दत्तू धामणकर (वय ५३, रा. उसे, ता. मावळ, जि. पुणे) असे जखमी झालेल्या भावाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. ३) याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद ( Family Land Dispute) दिली आहे.
Nilesh Badhale : बधालेवस्ती येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निलेश बधाले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी बाळू धामणकर हे आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर गेले होते. त्यावेळी आरोपी तुषार धामणकर हा बाळू यांच्या वाट्याच्या जमिनीवर गवत कापत असल्याचे दिसले. फिर्यादीने त्यास विरोध केल्यावर संतापलेल्या आरोपीने “आता तुला संपवतो” असे म्हणत हातातील विळ्याने हात व डोक्यावर वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत ( Family Land Dispute) आहेत.