मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील आंबी येथे आठ उंच इमारती असलेल्या एक्झर्बिया सोसायटी मध्ये कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. मागील काही दिवसांपासून या सोसायटी मधील कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या सोसायटी मध्ये कोरियन नागरिक, डी वाय पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी, तळेगाव एमआयडीसी मधील कामगार राहत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Parth Pawar Land Case : 99% मालकी पवारांची, तरीही गुन्हा फक्त भागीदारांवर
एक्सझरबिया, आंबी येथे आठ नऊ माळ्यांच्या आठ बिल्डिंग आहेत. गेले अनेक वर्ष या सोसायटीमध्ये केरकचरा संबंधित यंत्रणा नियमित उचलत होत्या. तथापि गेले दोन महिने या सोसायटी मधील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांचे साम्राज्य वाढले आहे.
Potoba Maharaj : वडगावमध्ये पोटोबा महाराज जन्मोत्सव सोहळा
या सोसायटीमध्ये बहुतेक ‘डी वाय पाटील, कॉलेज’ मधील विद्यार्थी तसेच आजूबाजूच्या औद्योगिक कंपन्यातील कामगार राहतात. येथील लोकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरात आजारांचे प्रमाण देखील वाढत चाललेले आहे.शासन स्वच्छ भारतचा नारा देत असताना आंबी मध्ये अशा तऱ्हेची अवस्था असावी हे फारच लाजीरवाणे आहे. याबाबत ग्रामपंचायत आंबी किंवा संबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.



















