गोळेवाडी, वारंगवाडीत महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद
मावळ ऑनलाईन – गावागावांत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे ( Entertainment Evening 2025) जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५” या उपक्रमाची गोळेवाडीत धमाकेदार सुरुवात झाली. हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या संध्याकाळी महिलांनी प्रचंड उत्साहाने सहभाग नोंदवला.
भर पावसातही महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती ( Entertainment Evening 2025) लाभल्याने परिसरात उत्सवाचे स्वरूप निर्माण झाले होते. या सोहळ्याला आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच माधुरीताई जाधव,माजी सरपंच अलकाताई जाधव, सुमनताई मापारी, रोहिदास जगदाळे, पोलीस पाटील भानुदास दरेकर, विष्णू गोळे, दत्ता लोंढे, सुरेश घोजगे यांच्यासह ग्रामस्थ,युवा कार्यकर्ते नामदेव गराडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.



तसेच वारंगवाडीत झालेल्या कार्यक्रमास अध्यक्षा अहिल्याताई मांडेकर, सचिव दिपालीताई तोडकर,कार्याध्यक्ष ज्योतीताई शिंदे, सचिव मोहिनीताई मांडेकर, उपाध्यक्ष मंदाताई वारिंगे,अनिता कारके, सचिव सुप्रिया कलवडे, ग्रामपंचायत सदस्या सारीकाताई धुमाळ,महिला आघाडी अध्यक्ष भाजपा अनिताताई सावले आदी प्रमुख उपस्थित ( Entertainment Evening 2025) होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांतदादा भागवत म्हणाले, “मनोरंजन संध्या २०२५ हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर महिलांच्या सहभागातून गावागावात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा उपक्रम आहे. समाज घडविण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची ( Entertainment Evening 2025) असून त्यांच्या कलागुणांना व उत्साहाला योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे. या उपक्रमातून एकोपा, आत्मविश्वास आणि आनंदाची नवी प्रेरणा गावागावांत पोहोचेल, हीच खरी ताकद आहे. यापुढेही अशा संधीचे आयोजन करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत राहणार आहे.”
या उपक्रमामुळे महिलांच्या कलागुणांना आणि सामाजिक सहभागाला नवे व्यासपीठ मिळाले असून, मावळात सांस्कृतिक चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याचे ग्रामस्थांनी ( Entertainment Evening 2025) सांगितले.