आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू
मावळ ऑनलाईन – राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
२ डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार आहेत. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करायचे आहे. यानंतर मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
नामनिर्देशन दाखल 10 नोव्हेंबर
अर्ज मुदत – 17 नोव्हेंबर
अर्ज छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघार – 21 नोव्हेंबर
निडणूक चिन्ह – 26 नोव्हेंबर
मतदान- 2 डिसेंबर
मतमोजणी – 3 डिसेंबर























