पीसीएमसी न्यूज : मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. (Election Fever in Maval) गावागावांत, वाड्या–वस्त्यांवर जाऊन मतदारांशी संवाद साधत, आपापली भूमिका मांडताना अनेक उमेदवार दिसत आहेत. नागरिकांच्या भेटीगाठी, प्रचारसभा आणि घराघरांतून संवाद साधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडत आहे.
वराळे–इंदोरी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख इच्छुक उमेदवार मेघा भागवत यांनी आंबी गावात महिलांच्या गाठीभेटींचा दौरा आयोजित केला. (Election Fever in Maval) त्यांनी विविध गावांमधील माता-भगिनींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भागवत यांच्या कार्यावर आपला विश्वास व्यक्त केला.

गाठीभेटींच्या दरम्यान महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी आपल्या भावना मांडताना, “मेघाताई आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांसाठी काम करणाऱ्या खऱ्या लोकनेत्या आहेत,” अशा शब्दांत समर्थन व्यक्त केले, (Election Fever in Maval) “आम्ही सर्व मेघाताई भागवत यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.” असे महिलांनी एकमुखाने सांगितले.

या दौऱ्यात यांनी सांगितले की, “महिलांच्या विकासाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम राबवणे हे माझे ध्येय आहे.” त्यांच्या या संवाद दौऱ्यामुळे गटातील राजकीय समीकरणे आणखी रंगतदार बनली आहेत. (Election Fever in Maval) मावळ तालुक्यातील या आगामी निवडणुकीत महिलांचा वाढता सहभाग आणि उमेदवारांना मिळणारा लोकसहभाग पाहता, पुढील काही दिवसांत निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार होणार असल्याचे दिसते.



















