मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या ( Ekveera Devi ) गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता पारंपरिक महानवमी होमाने मंगलमय वातावरणात करण्यात आली. अश्विन शुद्ध नवमी, गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आमदार सुनील शेळके, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, सचिव नवनाथ देशमुख, खजिनदार संजय गोविलकर, उपाध्यक्ष सागर देवकर, सह खजिनदार विकास पडवळ, वेहेरगावच्या सरपंच अर्चना देवकर, माजी सरपंच पूजा पडवळ, पोलीस पाटील अनिल पडवळ यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या होमास प्रारंभ करण्यात आला.
C O D Dehu Road Depot : सीओडी देहूरोड डेपोचा 83 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आमदार सुनील शेळके व देवस्थान ट्रस्टचे ( Ekveera Devi ) अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या हस्ते देवीचा महाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर देवीची आरती होऊन भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने दर्शन घेतले. मंगळवारी दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. नवरात्र उत्सव काळात लाखो भाविकांनी महाराष्ट्रभरातून येऊन आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले.
भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने काटेकोर नियोजन करण्यात आले होते. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन गडाच्या ( Ekveera Devi ) पायऱ्यांवर छताची सोय करण्यात आली होती. तसेच पिण्याच्या पाण्याची व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
PMC : दसऱ्यानिमित्त झाडांच्या फांद्या कापण्यास मनाई; मनपा कडून कडक इशारा
गडावर नऊ दिवस चाललेल्या या नवरात्र उत्सवात भक्तिमय वातावरण, ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक उत्साहात भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. परंपरेप्रमाणे महानवमीच्या होमाने उत्सवाची सांगता झाली असून, भाविकांच्या उपस्थितीत कार्ला गडावरील वातावरण भक्तीमय आणि ( Ekveera Devi ) उत्साहपूर्ण झाले होते.