शेतकऱ्यांच्या हक्कासाठी (DRDO Land Acquisition) मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
मावळ ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील मौजे तळेगाव दाभाडे व शेलारवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या DRDO मार्फत संपादित जमिनीच्या (DRDO Land Acquisition) वाढीव पुनर्वसन अनुदानाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक काल (बुधवारी) दिल्ली येथे संपन्न झाली.
दोन दिवसांपूर्वी मावळ भाजपा नेते विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन शेतकरी बांधवांना कोर्टाच्या आदेशानुसार वाढीव अनुदानाची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत फडणवीस साहेबांनी देशाचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून विनंती केली.
Pune: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १९ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त
या अनुसरून आज केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आणि संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वडगाव मावळ न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित शेतकऱ्यांना वाढीव पुनर्वसन अनुदान (DRDO Land Acquisition) मिळावे यावर सखोल चर्चा झाली.
या बैठकीस माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, देहुगाव व देहूरोड शहर भाजपा अध्यक्ष रघुवीर शेलार, माजी अध्यक्ष लहू मामा शेलार आणि उद्योजक शरद मामा शेलार यांची उपस्थिती होती.
Pimpri: पिंपरीत दुकानदारावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक
आजच्या बैठकीमुळे शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. लवकरच शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा वाढीव पुनर्वसन अनुदान मिळेल, असा विश्वास मंत्री महोदयांनी व्यक्त केल्याची माहिती रवींद्र भेगडे यांनी दिली.